ऑनलाईन टीम / मुंबई :
प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर यांची तब्येत अचानक बिघडल्याने बुधवारी रात्री त्यांना दक्षिण मुंबईतील एच एन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती रणधीर कपूर यांनी दिली.
67 वर्षीय ऋषी कपूर यांना कर्करोगाचा आजार आहे. गेल्या वर्षी अमेरिकेत उपचार घेतल्यानंतर ऋषी कपूर सप्टेंबरमध्ये भारतात परतले होते. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये ऋषी कपूर यांना दोनदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
ऋषी कपूर यांना कॅन्सर आहे, काल रात्री अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना श्वासोच्छवास करण्यासही त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात असूून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रणधीर कपूर यांनी म्हटले आहे.