- मुंबईतील रूग्णालयात 10 दिवसांपूर्वी पार पडली शस्त्रक्रिया
ऑनलाईन टीम / मुंबई :
ज्येष्ठ अभिनेते-चित्रपट निर्माते महेश मांजरेकर यांनी कॅन्सरवर यशस्वीरित्या मात केली असून ते घरी परतले आहे. महेश मांजरेकर हे मुंबईतील एका रूग्णालयात दाखल होते. त्यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. त्यांना मूत्राशयाच्या कर्करोगाचे निदान झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, 10 दिवसांपूर्वी महेश मांजरेकर मुंबईतील एच एन रिलायन्स रुग्णालयात दाखल झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली. महेश मांजरेकर यांची प्रकृती आता ठिक आहे.
महेश मांजरेकर यांनी मराठी सह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने आणि दिग्दर्शनाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. यामध्ये वॉटेंड, रेडी, दबंग, जिंदा, मुसाफिर, कांटे यासारखे बॉलिवूड चित्रपटांसह जिवा सखा, आई, वास्तव, निदान यासाख्या चित्रपटांचा देखील समावेश आहे. विशेष म्हणजे महेश एक उत्तम डान्सर असून 2006 मध्ये ’झलक दिखला जा’ या शोचे ते सेकंड रनरअप होते. तर 2018 मध्ये त्यांनी ’बिग बॉस मराठी’च्या पहिल्या सीझनचे सूत्रसंचालन देखील केले होते.