ऑनलाईन टीम / मुंबई :
बॉलीवूड अभिनेते, निर्माते राजीव कपूर यांचे हृदय विकाराच्या धक्क्याने मुंबईत निधन झाले आहे. तेे 58 वर्षांचे होते.
त्यांच्या राहत्या घरी दुपारी त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना चेंबूर येथील रुग्णालयात त्यांना नेण्यात आले पण तेथे दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
रणधीर कपूर यांनी स्वतः भावाच्या निधनाबद्दल माहिती देताना सांगितले की, ‘आज मी माझा छोटा भाऊ राजीवला गमावले. डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले. पण त्याचे प्राण वाचवू शकले नाही. पुढील सर्व कामांसाठी आता मी इस्पितळातच आहे.’
ऋषी कपूर यांच्या पत्नी नीतू कपूर यांनी इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत राजीव कपूर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. दरम्यान, कपूर घराण्यातील वर्षभरातील हा दुसरा मृत्यू आहे. गतवर्षी 30 एप्रिल 2020 मध्ये ऋषी कपूर यांचे कॅन्सरने निधन झाले होते.