मुंबई \ ऑनलाईन टीम
काही दिवसांपूर्वी तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्या आई ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांच संगमनेरमध्ये कोरोनानं निधन झालं होतं. आता त्यांच्यापाठोपाठ त्यांच्या थोरल्या कन्या अनिता आणि नातू अभिजीत यांचंही कोरोनानं निधन झालं आहे.
खेडकर कुटुंबियांतील जवळपास आठ सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. अशातच कुटुंबातील अनेकजण कोरोनामुक्त होऊन घरी परतले होते. परंतु, अवघ्या आठ दिवसांत खेडकर कुटुंबियांनी तीन जणांना गमावलं आहे. सर्वात आधी ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांच 25 मे रोजी निधन झालं. त्यापाठोपाठ त्यांच्या थोरल्या कन्या आणि नातवाचं कोरोनामुळं निधन झालं. त्यामुळे खेडकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सन 2005 मध्ये महाराष्ट्र शासनाने तमाशा क्षेत्रातील योगदानासाठीचा पहिला विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार देऊन कांताबाईंचा सन्मान केला आहे. दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाप्रसंगी कांताबाई आणि रघुवीर यांना तमाशा सदर करण्याचा बहुमान मिळाला आहे.