ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशातील ज्येष्ठ नागरिकांना येत्या 1 मार्चपासून मोफत कोरोना लस देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात माहिती दिली.
60 पेक्षा जास्त वय असणारे नागरिक तसेच इतर आजार असलेल्या 45 पेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना लस देण्यात येणार आहे. 10 हजार सरकारी आणि 20 हजार खासगी केंद्रांवर ही लसीकरण मोहीम पार पडणार आहे. तसेच ही लस मोफत दिली जाणार असून सर्व खर्च केंद्र सरकार उचलणार आहे. मात्र, ज्यांना खासगी रुग्णालयातून लसीकरण करुन घ्यायचे आहे त्यांना पैसे भरावे लागतील. यासाठी किती पैसे मोजावे लागतील याचा निर्णय आरोग्य मंत्रालय पुढील तीन ते चार दिवसांत घेईल, असेही जावडेकर म्हणाले.