प्रतिनिधी /फातोर्डा
अखिल गोवा ज्ये÷ नागरिक महासंघातर्फे नुकताच वाहतूक पोलीस विभागातील निवृत्त उपनिरीक्षक शोभा काणकोणकर यांचा सत्कार घडवून आणला गेला. संघटनेच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी महासंघाचे अध्यक्ष डायगो डिकॉस्ता होते. यावेळी ?सचिव ऍड. निकलांव कुलासो, प्रमुख पाहुण्या म्हणून महिला विभागाच्या संयोजिका शशिकला देसाई, सदस्य अनिल पै व इतर उपस्थित होते.
डायगो डिकॉस्ता यांनी स्वागत केले. अनिल पै यांनी सत्कारमूर्तीचा परिचय करून दिला. त्यांनी सांगितले की, शोभा काणकोणकर यांनी ?पुरुषांच्या बरोबरीने काम केले आहे. यात त्या कुठेही कमी पडल्या नाहीत. कामाच्या बाबतीत हलगर्जीपणा त्यांनी कधी केला नाही. शशिकला देसाई यांनी सांगितले की, आमच्या देशात मोठमोठय़ा शूरवीर महिला होऊन गेल्या आहेत. प्रत्येक क्षेत्रात महिलांनी उल्लेखनीय कार्य करून नाव कमविलेले आहे. ही उदाहरणे प्रत्येक महिलेने मनात बाळगायला हवीत.
यावेळी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन शशिकला देसाई यांनी शोभा काणकोणकर यांचा सत्कार केला तर डायगो डिकॉस्ता यांनी स्मृतिचिन्ह प्रदान केले. शोभा काणकोणकर यांनी मनोगतात सांगितले की, पोलीस खात्यात काम करताना वेळेचे बंधन नसते. त्यामुळे घरी वेळ देता येत नाही. अशावेळी पती व घरच्या अन्य सदस्यांनी सहकार्य केल्यामुळे काम करणे सोपे गेले. पोलीस खात्यात काम करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. प्रत्येकाने आपले काम शिस्तबद्ध पद्धतीने व प्रामाणिकपणे करावे, असा सल्ला त्यांनी दिला.
रिबेटा रॉड्रिग्ज यांनी प्रास्ताविक तर सूत्रसंचालन डोना रूझारियो यांनी केले. ऍड. कुलासो यांनी आभार मानले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सबिना कुलासो, ब्लॉसम आफान्सो, आवरा आवर्रोझा, अमिना नुरानी, आशा हेदे, जोस्विना रिबेलो, सिझर आफान्सो यांनी परिश्रम घेतले.