प्रतिनिधी /पणजी
गोमंतकातील ज्येष्ठ समाजसेवक व विविध संस्थानचे पदाधिकारी गंगाराम ऊर्फ भाई मोरजकर यांचे वयाच्या 88 व्या वषी बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात अल्प आजाराने आज बुधवारी दुपारी 2 वा. निधन झाले. त्याच्यावर गुरुवारी 2 डिसेंबर रोजी सकाळी 11.30 वा सान्तनेज स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात येतील.
ते गोवा चेंबर ऑफ कोमर्स अँड इंडस्ट्रीचे सदस्य,सदस्य गोवा स्टेट कंजुमर प्रोटेक्शन कानशील, गोवरमेंट ऑफ गोवा, झोनल रेल्वे यूजर्स कन्सल्टटीव्ह कमिटी, एस डबलू आर हुबली, सदस्य कोकण रेल्वे यूजर्स कन्सल्टटीव्ह कमिटी,नवी मुंबई, तसेच माजी अध्यक्ष व सदस्य लायन्स क्लब ऑफ पणजी, पिलर मेंबर ऑफ गोवा केन्सर सोसायटी, मॉनेजिंग कमेटी मेंबर रेड क्रॉस सोसायटी ऑफ इंडिया, गोवा उपाध्यक्ष आशा महाल, साहित्य सेवक मंडळ पणजी या संस्थेवर खजिनदार म्हणून काम केले.त्यांना गोवा सरकारचा उकृस्ट समाजसेवक म्हणून पुरस्कार प्राप्त झाला.