ऑनलाईन टीम / गोवा
गोव्यातील ज्येष्ठ साहित्यिक,पत्रकार अशोक नाईक तुयेकर यांचे अल्पशा अजाराने शुक्रवारी रात्री उशिरा मडगाव येथे निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. त्यांना ह्दयविकाराचा झटका आल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी उपचार सुरु असताना त्यांचे रात्री उशिरा निधन झाले. त्यांच्यावर आज दिनांक 22 जानेवारी 2022 रोजी दुपारी पाजीफोंड येथे अत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
नाईक यांनी साहित्यीक, कवी, पत्रकार म्हणून कार्य करताना समाजातील अनिष्ट रुढी परंपरा यांवर प्रखऱ भाष्य केलं,त्याच्या लेखणीचा रोख नेहमी समाजातील उपेक्षित घटकाकडे लक्ष वेधणारा होता. सूर्यकोटी सम प्रभ: या त्यांच्या नाटकाला गोवा कला आकादमीचे प्रथम पारितोषिक मिळाले होते. तसेच कॅलिडोस्कोप व नन्नरुख या त्यांच्या कविता संग्रहांना गोवा साहित्य अकादमीचे पुरस्कार मिळाले होते. श्री हिंदू गावो असोसिएशन तर्फे त्यांना बा.भ. बोरकर पुरस्कार मिळाला होता. तसेच पत्रकारितेत त्यांना लोकमान्य टिळक, संगम व अन्य पुरस्कार मिळालेले आहेत.