प्रतिनिधी /वास्को
जेटी मुरगांव येथील ज्येष्ठ भजनी कलाकार विष्णू (नाना) सावळाराम महाले यांचे नुकतेच अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित पुत्र, एक विवाहित कन्या, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. ते उत्कृष्ठ हार्मोनियमवादक होते.
मुळ उगवे पेडणे येथील विष्णू महाले वास्कोतच स्थायीक झाले होते. वास्कोतच त्यांची कला बहरास आली. त्यांनी अनेक शिष्यही निर्माण केले. त्यांनी कला व सांस्कृतीक क्षेत्रात दिलेल्या योगदानाची दखल घेऊन कला व संस्कृती संचालनालय तसेच गोमंतक मराठी अकादमी, वास्कोतील श्री दामोदर संगीत महोत्सव समिती व विविध संस्थांनी त्यांना सन्मानित केले होते.