एंट्री करताच झाले 1 दशलक्ष फॉलोअर्स
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुंदर अभिनेत्री आणि अभिनेता सूर्याची पत्नी ज्योतिकाने विवाहानंतर चित्रपटांमधून काम करणे कमी केले आहे. पण कार्यक्रम आणि पाटर्य़ांमध्ये ती दिसून येते. याचबरोबर तिने आता चाहत्यांना एक भेट दिली आहे. अभिनेत्रीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एंट्री केली आहे. चाहत्यांनी स्वतःच्या आवडत्या अभिनेत्रीचे जोरदार स्वागत केले आहे. इन्स्टावर एंट्री करताच ज्योतिकाचे एक दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत.
ज्योतिकाने ट्रेकिंगशी संबंधित एक पोस्ट केली आहे. तिच्या या पोस्टला केवळ 4 तासांमध्ये 3 लाखांहून अधिक लाइक्स प्राप्त झाले आहेत. काश्मीरमधील ट्रेकिंगचे छायाचित्र तिने प्रसारित केले आहे.
ज्योतिका यापूर्वी ‘मॅडम गीता रानी’ या दाक्षिणात्य चित्रपटात दिसून आली होती. या चित्रपटात तिने एका प्राध्यापिकेची भूमिका साकारली होती. शासकीय शाळांमधील अव्यवस्थेचा मुद्दा या चित्रपटाद्वारे मांडण्यात आला होता. ज्योतिकाने दाक्षिणात्य चित्रपटांसोबत हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे.