ग्वालियर : ऑनलाईन टीम
भाजप खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्या जयविलास पॅलेसमध्ये दरोडा घालण्यात आल्याची माहिती समोर आहे. त्यांच्या मध्य प्रदेशातील जयविलास पॅलेसमध्ये काही दरोडेखोर घुसले होते. दरोडेखोरांनी महालामधील राणी महालमध्ये घुसखोरी केल्याचे सांगण्यात आले आहे. स्थानिक पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. फॉरेन्सिक टीमच्या मदतीने घटनास्थळावरुन पुरावे मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. घटनास्थळी स्निफर डॉगही पाठवण्यात आले आहेत. दरम्यान महालात नेमके किती दरोडेखोर शिरले होते आणि काय सामान चोरी गेले आहे याची माहिती अद्याप पोलीस घेत आहेत.
एसपी अमित सांघी यांनी याविषयी सांगितले की, जयविलास पॅलेसमध्ये कडक सुरक्षा असताना दरोडेखोर आत घुसलेच कसे याची चौकशी पोलीस करत आहेत.