येळ्ळूरमध्ये अभिषेक-पूजाअर्चा : विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम
प्रतिनिधी /येळ्ळूर
येळ्ळूर येथील श्री ज्योतिर्लिंग मंदिरात ज्योतिर्लिंग प्रभावळ व काळभैरव प्रभावळची स्थापना करण्यात आली. यावेळी भव्य कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्योतिर्लिंग कमिटीचे अध्यक्ष देवाप्पा खेमनाकर होते. प्रभावळ आणलेल्या वाहनांची पूजा ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील आणि उपाध्यक्षा लक्ष्मी मासेकर यांच्या हस्ते करण्यात आली.
दीपप्रज्वलन मनोज परीट यांच्या हस्ते करण्यात आले. प्रभावळ कार्यक्रमाचे पूजन उद्योजक एन. डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कंत्राटदार मनोहर गोरल आणि शिवप्रतिष्ठापना हिंदुस्थानचे जिल्हा प्रमुख किरण गावडे, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत यांच्या हस्ते ज्योतिर्लिंगाला अभिषेक घालण्यात आला. यावेळी सुनील खन्नुकर, किरण बाळण्णाचे यांनीही अभिषेकावेळी भाग घेतला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दुद्दाप्पा बागेवाडी यांनी केले. प्रभावळ वाहनांची मिरवणूक सैनिक भवनपासून ज्योतिर्लिंग मंदिरापर्यंत काढण्यात आली. यावेळी सुहासिनींनी आरती ओवाळून पूजाअर्चा केली. मुख्य कार्यक्रम झाल्यानंतर तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला सेपेटरी भोमाणी गोरल, खजिनदार केशव पाटील, सुरेश कुट्रे, मल्लाप्पा गोरल, नागेंद्र कुट्रे, जोतिबा पाटील, कृष्णा पाटील, गणपत हट्टीकर, बाळू कंग्राळकर, रमेश कणबरकर, सचिन देसाई, तुळजाई यांच्यासह ज्योतिर्लिंग ट्रस्टचे सदस्य आणि भक्त उपस्थित होते.
या प्रभावळ मिरवणुकीमध्ये ग्राम पंचायत सदस्य प्रमोद पाटील, जोतिबा चौगुले, दयानंद उघाडे, राकेश परीट, राजू डोण्याण्णावर, मनीषा घाडी, राजकुंवर पावले, शालन पाटील, रेणुका मेलगे, शांता मासेकर, लक्ष्मी कणबरकर, सोनाली येळ्ळूरकर यांच्यासह भाविक उपस्थित होते.