प्रतिनिधी/ बेळगाव
बेनकनहळ्ळी ग्राम पंचायतच्या कार्यक्षेत्रात येणाऱया ज्योतीनगर येथील श्री मसोबा ग्राम दैवताची यात्रा मोठय़ा उत्साहात सोमवारी पार पडली. श्री मसोबा हे जागृत देवस्थान असून सालाबादप्रमाणे यावषीही उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पंचक्रोषीतील भाविकांनी मोठय़ा संख्येने उत्सवात सहभाग घेतला होता.
या उत्सवात शिवाजीनगर, गांधीनगर, ज्योतीनगर, गणेशपूर, लक्ष्मीनगर, क्रांतीनगर, गंगानगर, संकेश्वर, निपाणी, कोल्हापूर, गडहिंग्लज, सावंतवाडी आणि गोवा येथील भाविकांनी सहभाग दर्शविला. ‘कोरोना जावू दे रे बाबा’ अशी मागणी यावेळी करण्यात आली. सुरक्षित अंतर व कोरोनाचे नियम पाळून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रदीप तांजी, शंकर लाखे, आनंद कोलकार, माजी ग्राम पंचायत सदस्य अरुण कोलकार, संजय लाखे, लखन खोरागडे, परशुराम कुरंगी, रेखा लाखे, संजय डावाळे, संदीप खोरागडे, विकास डावाळे, दयानंद वाय. कुगजी, सुरेश सुर्वे, सोनिया जंगरा, आनंद शिंदे, मोहन कांबळे, राकेश सावंत, सूरज फडतरे, संपदा रंगुनकर, सुरेश सुणगार, प्रताप डांगे, प्रमोद सावंत, दयानंद भोगण, सुरेश सुणगार आदींनी महाप्रसादासाठी आर्थिक मदत केली. यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बी. डी. भोसले व श्री मसोबा मंदिर जीर्णोद्धार कमिटीचे सदस्य व नागरिकांनी परिश्रम घेतले.