प्रतिनिधी / बेळगाव
बेडकीहाळ येथील कै. बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे देण्यात येणारा राष्ट्रीय प्रेरणा गौरव पुरस्कार बेळगावच्या ज्योती अभय मिरजकर यांना देण्यात आला. निपाणी येथील सरकारी अतिथीगृहावर हा पुरस्कार वितरण कार्यक्रम पार पडला. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱया व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
ज्योती मिरजकर या भरतेश एज्यूकेशन ट्रस्टच्या एस. पी. एच. भरतेश कन्नड माध्यम शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून सेवा बजावित आहेत. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना आदर्श मुख्याध्यापक प्रेरणा पुरस्काराने गौरविण्यात आले. भरतेश एज्युकेशन ट्रस्टचे सचिव राजीव दोड्डण्णावर, प्रभारी सचिव विनोद दोड्डण्णावर, आर. पी. रामगौडा यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.