प्रतिनिधी / बेळगाव
द. म. शि. मंडळाच्या ज्योती सेंट्रल हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे आचरण करण्यात आले. मुख्याध्यापक जितेंद्र मुतगी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
यावेळी त्यांचे कार्य, त्यावेळची महिलांची स्थिती आणि सध्या महिलांना असणाऱया विविध संधी याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी शाळेचे शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.