उकळते पाणी बाहेर पडताच बर्फात रुपांतरित, लोकांसाठी ठरले आकर्षणाचे केंद्र
कजाकिस्तानच्या अल्माटी प्रांतात एक बर्फाचा ढिग अचानक समोर आला आहे. याला बर्फाचा ज्वालामुखी (आइस व्होल्कॅनो) म्हटले जात आहे. केगन आणि शरगानक या गावांदरम्यान हिमाच्छादित मैदानांमध्ये समोर आलेल्या या ढिगातून सातत्याने उकळते पाणी बाहेर पडत आहे. बाहेर पडताच हे पाणी बर्फात रुपांतरित होत आहे. यामुळे याची उंची वाढतच चालली आहे.
नूर सुल्तानपासून (पूर्वाश्रमीचे अस्ताना) 4 तासांच्या अंतरावर असलेल्या या आश्चर्याला पाहण्यासाठी गोठविणाऱया थंडीतही शेकडो लोक पोहोचत आहेत. मागील वर्षी अमेरिकेच्या लेक मिशिगनमध्येही अशाचप्रकारची आकृती निर्माण झाली होती, पण ती मानवी उंचीइतकीच होती. तर पहिल्यांदाच बर्फाचा असा ढिग इतक्या उंचीपर्यंत पोहोचला आहे.
पृथ्वीच्या अंतरंगातील हालचालींमुळे उष्ण पाणी फवाऱयाचे रुप धारण करते तर थंडीमुळे हे पाणी गोठून जाते. सातत्याने लाव्हा बाहेर पडत असल्याने पाणी बर्फाच्या स्वरुपात आसपास जमा होत आहे. यातूनच 45 फूट उंचीचा ज्वालामुखी तयार झाला आहे.
नव्या वर्षात उंचीत वाढ
हिवाळा सुरू होताच याची उंची वाढत चालली आहे. नव्या वर्षाच्या प्रारंभापासून ही उंची 14 मीटरपर्यंत पोहोचली आहे. हे ठिकाण आता लोकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले आहे.