पहिल्या टप्प्यात केकेआरच्या खात्यावर 7 सामन्यात केवळ 2 विजय, उर्वरित टप्प्यातील वाटचाल चमत्कारावरच अवलंबून
अबु धाबी / वृत्तसंस्था
आयपीएलच्या पहिल्या सत्रात प्रचंड झगडावे लागलेल्या दोन वेळचे चॅम्पियन्स कोलकाता नाईट रायडर्सची आज (सोमवार दि. 20) दुसऱया टप्प्यातील पहिल्या साखळी सामन्यात आरसीबीविरुद्ध लिटमस टेस्ट होत आहे. केकेआरला पहिल्या टप्प्यात 7 पैकी केवळ 2 सामनेच जिंकता आले असून येथे जवळपास प्रत्येक सामन्यात त्यांना विजय संपादन करण्याच्या निर्धारानेच मैदानात उतरण्याशिवाय दुसरा पर्याय नसेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार, सायंकाळी 7.30 वाजता या लढतीला सुरुवात होईल.
पहिल्या टप्प्याअखेर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबी संघ 10 गुणांसह तिसऱया स्थानी विराजमान आहे. त्यांनी पहिल्या टप्प्यात 7 सामने खेळत त्यात 5 विजय संपादन केले. 2012 व 2014 मध्ये विजेतेपद मिळवणारा केकेआरचा संघ मात्र कमालीचा अपयशी ठरला. ते 8 संघांच्या गुणतालिकेत चक्क सातव्या स्थानी फेकले गेले आहेत.
आता दुसऱया सत्रात मॉर्गनच्या नेतृत्वाखाली केकेआरचा संघ टर्नअराऊंडच्या अपेक्षेत असणार आहे. 2014 मध्ये सलग 9 सामने जिंकण्याचा पराक्रम केकेआरने केला होता. त्याच प्रकारचा पराक्रम त्यांना येथेही गाजवावा लागेल.
केकेआरचा मुख्य मेंटर डेव्हिड हसीने देखील पहिल्या सत्रातील अपयश मागे सारत आपल्या संघाला नव्याने सुरुवात करावी लागेल, हे स्पष्ट केले. ‘आमच्या संघाने यापूर्वी देखील असा पराक्रम प्रत्यक्षात साकारला आहे. त्यामुळे, यात अवघड काहीच नाही. एकदा अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली की, तेथे स्पर्धा नव्याने सुरु होते’, असे हसी तपशीलवार बोलताना म्हणाला.
अर्थात, आरसीबीसारखा अव्वल प्रतिस्पर्धी समोर असताना केकेआरसाठी ही लढत म्हणावी इतकी सोपी निश्चितच नसेल. आरसीबीचा दस्तुरखुद्द कर्णधार विराट कोहलीने टी-20 विश्वचषकानंतर आपण भारतीय संघाचे नेतृत्व सोडणार असल्याची घोषणा केली असून विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर, आपली बॅट तळपती राहील, यात विराट अजिबात कसर सोडणार नाही, हे जवळपास निश्चित आहे.
केकेआरला पहिल्या टप्प्यात केवळ दोनच सामने जिंकता आले आणि ते ही पंजाब किंग्स व सनरायजर्स हैदराबाद अशा खराब फॉर्ममधील संघाविरुद्धचे होते. त्यामुळे, येथे नव्याने सुरुवात, हाच एकमेव पर्याय त्यांच्यासमोर असणार आहे.
मॉर्गनचा अनुभव महत्त्वाचा
केकेआरसाठी उर्वरित टप्प्यात इयॉन मॉर्गनचा अनुभव महत्त्वाचा ठरु शकतो. मॉर्गन स्वतः पुढाकाराने लढला आणि त्याला सहकाऱयांचीही समयोचित साथ लाभली तर केकेआरचा संघ मुसंडी मारण्याचा प्रयत्न निश्चितच करु शकतो. दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, राहुल त्रिपाठी व शकीब अल हसन यांच्याकडून केकेआरला बऱयाच प्रमाणात अपेक्षा असतील. केकेआरच्या गोलंदाजीची धुरा किवीज गोलंदाज टीम साऊदीकडे असेल.
आरसीबीचा संघ निश्ंिचत
एकीकडे, केकेआरची कसोटी लागणार, हे स्पष्ट असताना दुसरीकडे, आरसीबीचा संघ मात्र बऱयाच निकषावर निश्ंिचत आहे. कोहलीला (198 धावा) लौकिकाला साजेसा खेळ साकारता आला नसला तरी युवा फलंदाज देवदत्त पडिक्कलने (195) सातत्य राखले आहे. गोलंदाजीच्या आघाडीवर, मोहम्मद सिराज, काईल जेमिसन यांच्यावर मुख्य धुरा असेल. हर्षल पटेल, नवदीप सैनी, यजुवेंद्र चहल हे टी-20 वर्ल्डकप संघातून वगळले गेले असल्याने इर्षेने खेळण्याची शक्यता असेल. वणिंदू हसरंगा व दुष्मंता चमीरा या लंकन खेळाडूंना ऍडम झाम्पा व केन रिचर्डसन यांच्या जागेवर निवडले गेले आहे.
संभाव्य संघ
कोलकाता नाईट रायडर्स ः इयॉन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, गुरकिरत सिंग मान, करुण नायर, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, शुभमन गिल, हरभजन सिंग, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्युसन, पवन नेगी, एम. प्रसिद्ध कृष्णा, संदीप वॉरियर, शिवम दुबे, टीम साऊदी, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, आंद्रे रसेल, बेन कटिंग, शकीब अल-हसन, सुनील नरेन, वेंकटेश अय्यर, शेल्डॉन जॅक्सन, टीम सेफर्ट.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर ः विराट कोहली (कर्णधार), नवदीप सैनी, ग्लेन मॅक्सवेल, डॅन ख्रिस्तियन, रजत पाटीदार, दुष्मंता चमीरा, पवन देशपांडे, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, मोहम्मद अझरुद्दीन, सचिन बेबी, वणिंदू हसरंगा, जॉर्ज गॅरटॉन, यजुवेंद्र चहल, शाहबाज अहमद, देवदत्त पडिक्कल, काईल जेमिसन, सुयश प्रभुदेसाई, केएस भरत, टीम डेव्हिड, आकाश दीप, एबी डीव्हिलियर्स.
सामन्याची वेळ ः सायं. 7.30 वा.
इतिहास केकेआरच्या बाजूने, वर्तमान आरसीबीच्या बाजूने!
आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात केकेआर-आरसीबी यांच्यात आजवर 28 सामने झाले असून त्यात केकेआरने 18 सामने तर आरसीबीने 13 सामने जिंकले आहेत. साहजिकच, इतिहास केकेआरच्या बाजूने आहे. सध्याचा दोन्ही संघातील फॉर्म पाहता मात्र आरसीबीचे पारडे जड असू शकेल, असे चित्र आहे. यंदाच्या आवृत्तीत पहिल्या टप्प्यात दोन्ही संघ चेन्नईत आमनेसामने भिडले, त्यावेळी कोलकाता नाईट रायडर्सचा संघ आरसीबीविरुद्ध 38 धावांनी पराभूत झाला होता, ही बाबही लक्षवेधी आहे.
प्रंट वॉरियर्सना अभिवादनासाठी आरसीबी संघ आज ब्ल्यू जर्सीत
कोरोना महामारीविरुद्ध लढय़ात प्राण पणाला लावून झुंजणाऱया प्रंट वॉरियर्सना कुर्निसात करण्यासाठी आरसीबीचा संघ आज (दि. 20) केकेआरविरुद्ध ब्ल्यू जर्सीमध्ये मैदानात उतरणार आहे. प्रंट वॉरियर्स हे नेहमी पीपीई किटमध्येच असतात. त्या पार्श्वभूमीवर आरसीबीने ब्ल्यू जर्सीला पसंती दिली. आरसीबीचा कर्णधार विराट कोहली व व्यवस्थापकीय अधिकारी प्रथमेश मिश्रा यांनी शनिवारीच या जर्सीचे अनावरण केले.
केकेआरची भिस्त केवळ शुभमन गिल व नितीश राणावर
यंदा झगडत असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सची फलंदाजीच्या आघाडीवर शुभमन गिल व नितीश राणा यांच्यावरच प्रामुख्याने भिस्त असणार आहे, हे निश्चित आहे. हे दोन्ही फलंदाज पहिल्या टप्प्यात फारशा धावा जमवू शकले नाहीत, यामुळेच केकेआर चिंतेत आहे. गिल व राणा यांना लवकर सूर सापडला तर केकेआरसाठी ते विशेष महत्त्वाचे असेल. यापूर्वी, पहिल्या टप्प्यात शुभमन गिलला 132 तर राणाला 7 सामन्यात 201 धावा जमवता आल्या.