नवी मुंबई / वृत्तसंस्था
माजी चॅम्पियन्स कोलकाता नाईट रायडर्सचा संघ आज (शनिवार दि. 23) आयपीएल साखळी सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध लढताना विजयाच्या ट्रकवर परतण्यासाठी महत्त्वाकांक्षी असेल. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील केकेआरला यापूर्वी सलग 3 पराभव पत्करावे लागले असून ही अपयशी मालिका खंडित करण्यासाठी त्यांना अनुभव पणाला लावावा लागेल. ही लढत दुपारी 3.30 वाजता खेळवली जाणार आहे.
हार्दिक पंडय़ाच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सचा संघ फलंदाजी व गोलंदाजीच्या दोन्ही आघाडय़ांवर मजबूत आहे. चेन्नईविरुद्ध मागील लढतीत पंडय़ाला दुखापतीमुळे खेळता आले नसले तरी त्याच्या गैरहजेरीत रशिद खानच्या नेतृत्वाखाली गुजरातने विजय मिळवला होता. रशिदचा सेन्सेशनल फॉर्म या संघासाठी महत्त्वाचा ठरु शकतो. रशिदने यापूर्वी 21 चेंडूत 40 धावांची आतषबाजी करत आपली उपयुक्तता अधोरेखित केली होती.
या लढतीत कोलकाताचे गोलंदाज कसा मारा करतात, यावरही लक्ष असेल. केकेआरच्या गोलंदाजीची धुरा पॅट कमिन्स, उमेश यादव, फिरकीपटू वरुण चक्रवर्ती यांच्यावर असून राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांनी त्यांचा बराच समाचार घेतला होता. टीम साऊदीला येथे संधी मिळणार का, यावरही बरेच काही अवलंबून असेल. शुभमन गिल व सुनील नरेन यांच्यातही जुगलबंदी रंगू शकते.
संभाव्य संघ
केकेआर ः श्रेयस अय्यर (कर्णधार), ऍरॉन फिंच, अभिजीत तोमर, अजिंक्य रहाणे, बाबा इंद्रजीत, नितीश राणा, प्रथम सिंग, रिंकू सिंग, अशोक शर्मा, पॅट कमिन्स, रसिक दार, शिवम मावी, टीम साऊदी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती, अमन खान, आंद्रे रसेल, अनुकूल रॉय, चमिका करुणारत्ने, मोहम्मद नबी, रमेश कुमार, सुनील नरेन, वेंकटेश अय्यर, सॅम बिलिंग्ज, शेल्डॉन जॅक्सन.
गुजरात टायटन्स ः हार्दिक पंडय़ा (कर्णधार), अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, गुरकिरत सिंग, बी. साई सुदर्शन, शुभमन गिल, राहुल तेवातिया, विजय शंकर, मॅथ्यू वेड, रहमनुल्लाह गुरबाज, वृद्धिमान साहा, अल्झारी जोसेफ, दर्शन नळकांडे, डॉमिनिक ड्रेक्स, जयंत यादव, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी, नूर अहमद, प्रदीप संगवान, रशिद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, वरुण ऍरॉन, यश दयाल.
सामन्याची वेळ ः दुपारी 3.30 वा.