कधी झटपट असा कोणता पदार्थ करावा असा प्रश्न पडतो. अशा वेळी ‘रोस्टेड पॉटॅटो विथ ग्रीन चिली’ या पदार्थाचा विचार करायला हवा. खरं तर ही झटपट होणारी रेसिपी आहे. या पदार्थाचं नाव वेगळं असलं तरी तो अगदी झटपट बनवता येतो. जेवणासोबत साईड डिश म्हणून हा पदार्थ बनवून बघायला काहीच हरकत नाही.
साहित्य : पाव किलो उकडलेले बटाटे, दोन हिरव्या मिरच्या चिरून घ्या, एक चमचा लाल तिखट, दोन चमचे लोणी, दोन चमचे लिंबाचा रस, मीठ आणि कोथिंबीर.
कृती : सर्वप्रथम बटाटे सोलून त्याचे गोल काप करून घ्या. आता एका बेकिंग डिशला लोणी लावून घ्या. त्यावर बटाटय़ाचे गोलाकार स्लाईस ठेवा. त्यावर थोडं लोणी घाला. मीठ, तिखट आणि हिरव्या मिरचीचे तुकडे घाला. मधल्या काळात मायक्रोवेव्ह 200 अंशावर प्री हिट करून घ्या. आता त्यात बेकिंग डिश ठेवा. 15 ते 20 मिनिटं बेक करा. त्यानंतर त्यावर कोथिंबीर घाला. गरमागरम खा.