वार्ताहर /रामनगर
ओम्नी झाडाला जाऊन धडकल्याने दोन इसम गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान घडली.रामनगर येथून धारवाडच्या दिशेने एका दैनिकाची पेपर घेऊन जाणारी मारुती ओम्नी वाहन नागरगाळीनजीक वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याशेजारी असणाऱया झाडाला धडकली. त्यामुळे वाहनात बसलेले दोन्ही इसम अडकून पडले.
त्यामुळे या भागातून येणाऱया जाणाऱयांनी त्यांना वाहनातून बाहेर काढून अधिक उपचारासाठी रामनगर दवाखान्यात पाठवले. घटनेची नोंद लोंढा पोलिसात करण्यात आली आहे.