काकती येथे हा माझा धर्म पशु बचाव दलतर्फे आयोजन : विद्यार्थ्यांचा लक्षणीय सहभाग
प्रतिनिधी / बेळगाव
वन विभाग, ग्राम पंचायत, जिल्हा पंचायत हा माझा धर्म पशु बचाव दल यांच्यातर्फे काकती येथे झाडे वाचवा, पाण्याची बचत करा आणि पशु-पक्ष्यांचे संवर्धन करा, याबाबत जनजागृती करण्यात
आली. यामध्ये प्राथमिक मराठी, कन्नड, उर्दू शाळा आणि हायस्कूलचे विद्यार्थी सहभागी झाले होते. अलीकडे पशु-पक्ष्यांच्या संख्येत झपाटय़ाने घट झाली आहे. शिवाय वृक्षांची बेसुमार कत्तल केली जात आहे. त्यामुळे वृक्षांची संख्या मोठय़ा प्रमाणात घटली आहे. याचा निसर्गचक्रावर परिणाम होत आहे. यामुळे पशु-पक्ष्यांबरोबर वृक्ष वाचविण्यासाठी प्रत्येकांनी प्रयत्न केले पाहिजेत, असा संदेश या फेरीतून देण्यात आला. याप्रसंगी विनायक केसरकर, गजानन गवाणे, ज्योती गवी, सिद्धगौडा सुणगार, रुदेश चौगुले, सूरज कडोलकर यासह विद्यार्थी उपस्थित
होते.