आपत्कालीन परवानगीसाठी पाठपुरावा – सात-आठ दिवसांत अर्ज होणार सादर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन, स्पुटनिक-व्हीनंतर आता देशात कोरोना प्रतिबंधक चौथी लस येत आहे. भारतीय फार्मास्युटिकल कंपनी झायडस कॅडिला आपल्या झायकोव्ह-डी या लसीच्या आपत्कालीन वापराच्या परवानगीसाठी याच आठवडय़ात अर्ज करण्याची शक्मयता आहे. जर या लसीला परवानगी मिळाली तर ही पहिली डीएनए बेस्ड लस असणार आहे.
देशात सध्या कोविशिल्ड, कोव्हॅक्सनिचे दोन डोस देण्यात येत आहेत. तर स्पुटनिक लाईटचा सिंगल डोस देण्यात येणार आहे. परंतु ‘झायकोव्ह’चे तीन डोस घ्यावे लागणार आहेत. फेज 1 आणि फेज 2 ट्रायल्समध्ये आलेल्या अहवालानुसार तीन डोसनंतर चांगली इम्युनिटी मिळत असल्याचे दिसून आले आहे. झायडस कॅडिला ही नीडल-फ्री म्हणजेच सुई नसलेली लस आहे. ही लस जेट इंजेक्टरच्या माध्यमातून दिली जाते. या जेट इंजेक्टरचा वापर अमेरिकेत सर्वाधिक होतो. अशा पद्धतीची लस हाय प्रेशरच्या माध्यमातून व्यक्तीच्या त्वचेमध्ये दिली जाऊ शकते.