ऑनलाईन टीम / रांची :
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ही धमकी त्यांना ईमेलद्वारे करण्यात आली आहे. त्यांना आलेल्या मेल मध्ये म्हटले आहे की, जर तुम्ही नाही सुधरलात तर तुम्हाला मारून टाकण्यात येईल.
धमकीचा हा प्रकार समोर येताच राज्य शासनामध्ये एकच गोंधळ उडाला आहे. संपूर्ण केसची माहिती घेण्यासाठी एक विशेष टीम तयार करण्यात आली आहे. सीएमआयडी ने एसआयटी ला ईमेल पाठविणाऱ्या आरोपींना तत्काळ अटक करण्याचे आदेश दिले आहेत.
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना पाठवण्यात आलेल्या मेलमध्ये दोन धमक्या असून त्यात म्हटले आहे की, सुधरा नाही तर तुम्हाला मारून टाकण्यात येईल. या घटनेबाबत रांचीतील सायबर ठाण्यात प्राथमिक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सीआयडीने संबंधित ईमेलच्या एड्रेस चा आय पी एड्रेस शोधून काढला आहे आणि त्याद्वारे आरोपींचा शोध घेतला जात आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशावरून या प्रकरणाचा गोपनीय पद्धतीने तपास केला जात आहे. सध्या या भागात नक्षलवाद्यांच्या कारवाया वाढल्या आहेत त्यामुळे या प्रकरणाचा बारकाईने तपास केला जात आहे. याआधीचे मुख्यमंत्री रघुबर दास यांना देखील अशा प्रकारच्या धमक्या देण्यात आल्या होत्या.