ऑनलाईन टीम / साहिबगंज :
झारखंडमधील साहिबगंज भागात शुक्रवारी दुपारी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. रिश्टल स्केलवर भूकंपाची तीव्रता 4.3 एवढी आहे.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार भूकंपाचे धक्के दुपारी 12 वाजून 7 मिनिटांनी जाणवले. त्याची तीव्रता 4.3 रिश्टल स्केल एवढी आहे. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही आहे.