ऑनलाईन टीम / रांची :
झारखंडच्या पूर्व सिंहभूम जिल्ह्यातील भीतरडारी खाणीत 250 किलो सोन्याचा खजिना सापडला आहे. भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाचे उपमहासंचालक जनार्दन प्रसाद आणि संचालक पंकज कुमार सिंह यांनी खाणीत सोन्याचे साठे सापडल्याचा अहवाल झारखंड राज्याचे खाण सचिव सचिव अबूबकर सिद्दीकी यांच्याकडे सादर केला आहे.
भूगर्भतज्ज्ञ पंकज कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली भीतरडारी खाणीमध्ये सोन्याचे साठे शोधण्याचे काम सुरू होते. यावेळी खाणीत वेगवेगळ्या गुणवत्तेच्या सोन्याचे प्रमाण आढळले आहे. खाणीतून विविध व्हरायटीच्या सोन्याच्या धातूंचे 250 किलो सोने आहे. यापूर्वी पहाडडीहा, लावा, कुंदरकोचा आणि पारसी येथे सोन्याचे साठे सापडले आहेत.
झारखंड सरकारने सापडलेल्या 250 किलो सोन्याच्या लिलावाची तयारी सुरू केली आहे. या सोन्याच्या लिलावातून सरकारच्या तिजोरीत अंदाजे 120 कोटी रुपयांची भर पडण्याची शक्यता आहे.