ऑनलाईन टीम / रांची :
झारखंड आणि कर्नाटक राज्यात आज सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. झारखंडमधील जमशेदपूर येथे सकाळी 6.55 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 4.7 रिश्टर स्केल एवढी होती. तर कर्नाटकातील हंपी येथे 4.0 रिश्टर स्केलचे धक्के जाणवले. सुदैवाने यामध्ये कोणतीही वित्त अथवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
कर्नाटक आणि झारखंड या दोन्ही राज्यात एकाच वेळी भूकंप झाला, परंतु तीव्रता वेगळी होती. मागील काही दिवसात देशाच्या राजधानीसह अनेक राज्यात भूकंप झाला आहे. दिल्ली-एनसीआर प्रदेशात गेल्या दीड महिन्यांत अंदाजे दहा वेळा भूकंप झाला.