ऑनलाईन टीम / रांची :
झारखंडमधील चाईबासामध्ये नक्षलवाद्यांनी रविवारी रात्री सोनुआ आणि चक्रधरपूरमध्ये एका रेल्वे ट्रॅकवर स्फोट घडवून आणला आहे. त्यामुुळे हावडा – मुंबई मुख्य रेल्वे मार्ग ठप्प झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे विभागाच्या लोटापहाडजवळ नक्षलवाद्यांनी लँडमाईन्सच्या मदतीने रेल्वे ट्रॅकवरच स्फोट घडवून आणला. रात्री 2.15 मिनिटांनी ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच चक्रधरपूर रेल्वे विभागाकडून संबंधित रेल्वेची वाहतूक रोखण्यात आली होती.
चाईबासामधील एसीपीनीं सोमवारी सांगितले की, नक्षलवाद्यांकडून रेल्वे ट्रॅक उडवण्यात आल्याची माहिती मिळताच जिल्हा पोलीस, आरपीएफ सोबतच रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि स्फोटात तुटलेला ट्रॅक दुरुस्त केला आहे. तसेच या घटनेची अधिक चौकशी सुरू आहे. तर अन्य ट्रॅक वरील वाहतूक सुरू झाली आहे.