वृत्तसंस्था/ दुबई
झिंबाब्वेचा फिरकी गोलंदाज रॉय काया याच्या गोलंदाजीच्या शैलीत दोष आढळल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याला गोलंदाजी करण्याला तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.
झिंबाब्वेचा गोलंदाज रॉय काया याच्या गोलंदाजीच्या शैलीमध्ये त्रुटी आढळत असल्याने त्याला तूर्ताला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करण्यास आयसीसीने हंगामी स्वरूपाची बंदी घातली आहे. हरारेत 7 ते 11 जुलै दरम्यान झालेल्या बांगलादेश बरोबरच्या एकमेव कसोटी सामन्यात खेळताना कायाच्या गोलंदाजीबाबत सामना अहवालामध्ये दोष असल्याचे नमूद करण्यात आले. कायाला गोलंदाजीच्या शैलीमध्ये नियमानुसार योग्य तो बदल करण्याचा आदेश देण्यात आला असून येत्या काही दिवसामध्ये त्याची आयसीसीतर्फे गोलंदाजीची चाचणी घेतली जाईल.