वृत्तसंस्था / कराची
झिंबाब्वेचा क्रिकेट संघ चालू महिन्याच्या अखेरीस पाकच्या दौऱयावर वनडे आणि टी-20 मालिका खेळण्यासाठी दाखल होणार आहे. या मालिकांसाठी झिंबाब्वेचा 20 जणांचा चमू घोषित करण्यात आला आहे. 34 वर्षीय अष्टपैलू चामु चिभाभाची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
झिंबाब्वेचा संघ इस्लामाबादमध्ये 20 ऑक्टोबरला दाखल होणार आहे. दरम्यान उभय संघातील पहिला वनडे सामना रावळपिंडीत 30 ऑक्टोबरला खेळविला जाणार आहे. पाकच्या दौऱयात झिंबाब्वेचा संघ तीन वनडे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. झिंबाब्वेचा संघ पाकमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांना 21 ते 27 ऑक्टोबर दरम्यान आयसोलेशनमध्ये राहावे लागेल. चिभाभाने आतापर्यंत तीन कसोटी, 104 वनडे आणि 33 टी-20 सामन्यांत झिंबाब्वेचे प्रतिनिधीत्व केले आहे. 2016 साली त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
झिंबाब्वे संघ- सी. चिभाभा (कर्णधार), फराज अक्रम, रेयान बर्ल, ब्रायन चारी, टी.छतारा, ई. चिगुंबुरा, चिसोरो, एर्व्हीन, के.तिनाशे, मधेवेअर, डब्ल्यू मासाकेझा, मुंबा, मुटूंबामी, मुझारबेनी, एन्गेरेव्हा, सिकंदर रझा, एम. शुंभा, ब्रेंडॉन टेलर, डी.टिरिपेनो आणि सीन विल्यम्स.