वृत्तसंस्था/ कराची
आगामी मायदेशात होणाऱया झिम्बाब्वे बरोबरच्या मालिकेत आणि त्यानंतर न्यूझीलंड दौऱयासाठी पाकचे प्रमुख प्रशिक्षक आणि निवड समिती प्रमुख मिसबाह उल हक यांनी 35 संभाव्य खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.
येत्या नोव्हेंबरमध्ये पाकचा वरि÷ संघ तसेच पाकचा अ संघ न्यूझीलंड दौऱयावर जाणार आहे. पाकचे प्रमुख प्रशिक्षक आणि निवड समिती प्रमुख मिसबाह यांनी राष्ट्रीय टी-20 स्पर्धेत सहभागी झालेल्या विविध प्रांतीय संघांच्या प्रशिक्षकांबरोबर चर्चा केली. या आगामी मालिकांसाठी पीसीबीने देशातील नवोदित युवा खेळाडूंना संधी देण्यावर भर दिला आहे. गेल्या वषीच्या राष्ट्रीय क्रिकेट हंगामात तसेच राष्ट्रीय टी-20 स्पर्धेत दर्जेदार कामगिरी केलेल्या नवोदित क्रिकेटपटूंना निवडण्यात आले आहे. पाकचा वरि÷ संघ न्यूझीलंडच्या दौऱयात दोन कसोटी आणि टी-20 चे तीन सामने खेळणार आहे. त्याचप्रमाणे पाकचा अ संघ न्यूझीलंडच्या दौऱयात चार दिवसांचे दोन सामने आणि टी-20 चे सहा सामने खेळणार आहे.
मिसबाह यांनी जाहीर केलेल्या संभाव्य 35 क्रिकेटपटूंच्या यादीमध्ये नवोदित फलंदाज झिशान अश्रफ, अब्दुल्ला शफीक, झिशान मलिक, त्याचप्रमाणे डावखुरा फिरकी गोलंदाज नुमन अली यांचा समावेश केला आहे. पाक संघाच्या इंग्लंड दौऱयानंतर मिसबाहवर पीसीबीकडून बरेच दडपण आले होते. पाकचा संघ दर्जेदार बनविण्यासाठी मिसबाहचे प्रयत्न चालू आहेत. मिसबाह पाक सुपरलिग स्पर्धेत सहभागी होणाऱया युनायटेड इस्लामाबाद संघाचे फ्रँचायझी आहेत. पीसीबीने सध्या मिसबाहवर प्रमुख प्रशिक्षक आणि निवड समिती प्रमुख अशी दुहेरी जबाबदारी सोपविली आहे.