काही दिवसांपूर्वी हेमंत ढोमे दिग्दर्शित झिम्मा या चित्रपटाचे पोस्टर झळकले होते. यात निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली, सायली संजीव, मफण्मयी गोडबोले यांच्यासोबत सिद्धार्थ चांदेकर दिसत होता. पोस्टरवरून काहीतरी भन्नाट असणाऱया या चित्रपटात काय पाहायला मिळेल, याची सर्वांनाच उत्सुकता होती. आता यावरील पडदा उठला असून झिम्माचा टिझर आज प्रदर्शित करण्यात आला आहे. मराठी सिनेसफष्टीतील या आघाडीच्या अभिनेत्रींच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना एकाच सिनेमात पाहता येणार आहे.
बायकांच्या मनात काय सुरु आहे,त्या कधी कशा व्यक्त होतील, याचा थांगपत्ता लागणं जरा कठीणच. अशाच वेगवेगळय़ा व्यक्तिमत्वाच्या बायका जेव्हा एकत्र येतात तेव्हा जी धमाल होते, तीच आपल्याला झिम्मामध्ये पाहायला मिळणार आहे. इंग्लंडला फिरायला निघालेल्या या सात जणींचा प्रवास अतिशय रंजक दिसत आहे. इंग्लंडला जाण्यासाठी नवऱयाची परवानगी मागणारी बाई, तिथे जाताना घरातील सदस्यांना अनेक सूचना देणारी बाई, बॅग पॅक करताना भांडणं करणारी आई- मुलगी, घरच्यांना खोटं सांगून फिरायला निघालेली बाई, मुलीच्या काळजीपोटी इंग्लंडला जाण्यासाठी द्विधा मनस्थितीत असलेली आई, तर एकीकडे आईची परवानगी न मागता मी फिरायला जात असल्याचे ठासून सांगणारी तरुणी अशा सात वेगवेगळय़ा पार्श्वभूमीतून आलेल्या, वेगवेगळय़ा विचारांच्या, एकमेकींशी ओळख नसलेल्या या महिलांना त्यांची स्वतःशी आणि इतरांशी एक नवी ओळख करून देणारी ही सफर ठरणार असून ही सफर घडवून आणणार आहे सिद्धार्थ चांदेकर. या सहलीत सिद्धार्थ पास होतो की नापास हे मात्र चित्रपट पाहिल्यावरच कळेल. मात्र टिझर पाहून तरी झिम्मा हा अत्यंत सकारात्मक भाव असलेला आणि धमाल, मस्ती, मजा असणारा आणि मनोरंजनाचे एक फुल्ल ऑन पॅकेज देणारा कौटुंबिक सिनेमा आहे.
या सिनेमाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे सांगतो, हा सिनेमा बघताना या सात जणींमध्ये कुठेतरी आपणही दडलो आहोत, याची प्रत्येक स्त्राrला नक्कीच जाणीव होईल. सगळी बंधने, जबाबदाऱया काही काळासाठी विसरून फक्त स्वतःसाठी स्वछंदी आयुष्य जगणाऱया या सात अतरंगी बायकांची धमाकेदार कहाणी प्रेक्षकांना यात पाहता येणार आहे. इंद्रधनुष्याच्या सात रंगांप्रमाणे असणाऱया या सात स्त्रिया त्यांच्या आयुष्यातील हे रंग अधिक गडद करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. महत्वाचे म्हणजे झिम्माचा टिझर सर्वांसमोर आणण्यासाठी आजच्या दिवसापेक्षा दुसरा कोणता चांगला दिवस असूच शकत नाही.
श्चलचित्र कंपनीश् प्रस्तुत श्अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंटश् आणि श्क्रेझी फ्यू फिल्म्सश् निर्मित शझिम्माश् हा सिनेमा येत्या 23 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे लेखन इरावती कर्णिक यांचे असून चित्रपटाला अमितराज यांचे संगीत लाभले आहे. तर छायाचित्रणाची धुरा संजय मेमाणे यांनी सांभाळली आहे. क्षिती जोग, अजिंक्य ढमाळ, विराज गवस, उर्फी काझमी, अनुपम मिश्रा आणि स्वाती खोपकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.