नवी दिल्ली
डिलिव्हरी क्षेत्रामध्ये असणाऱया झीप इलेक्ट्रिक कंपनीने चालू आर्थिक वर्षामध्ये पाचपट उलाढाल वाढीचे संकेत व्यक्त केले आहेत. कंपनीची उलाढाल सदरच्या कालावधीत 25 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचे सांगितले जात आहे. 2022 मध्ये कंपनीने 1 लाख इलेक्ट्रिक वाहनांची डिलिव्हरी करण्याचा विचार चालविला आहे. किराणा, औषधे, खाद्य आणि ई कॉमर्स क्षेत्रातल्या दिग्गज कंपन्यांसोबत दिल्ली एनसीआर, बेंगळूर, हैद्राबाद, मुंबई आणि पुणे येथे कंपनी साहित्य पुरवठा सेवा देत आहे.