नवी दिल्ली
सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीत मनोरंजन क्षेत्रातील झी एंटरटेनमेंटचा निव्वळ नफा 93 कोटी रुपयांवर पोहचला आहे. कोरोनाचा असर एकंदर झीच्या व्यवसायावर दिसला आहे. वर्षामागे कंपनीने याच कालावधीत 412 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. तिमाहीअखेर उत्पन्न 1 हजार 760 कोटी रुपयांवर पोहचले होते. जे मागच्या वर्षी याच कालावधीत 2 हजार 190 कोटी रुपये होते. कंपनीला जाहिरातीच्या माध्यमातून 902 कोटींचा महसूल मिळाला आहे. मागच्या वर्षी याच कालावधीतला महसूल 1 हजार 224 कोटी रुपये होता.