लॉकडाऊनमध्ये घरी बसून सगळेच कंटाळले आहेत. पण, हा कंटाळा दूर करण्यासाठी अनेकांनी पर्याय निवडलाय, तो छंद जोपासण्याचा! झी युवा वाहिनीने अशा छंद जोपासणाऱयांसाठी लाव रे तो व्हिडीओच्या स्वरूपात एक संधी उपलब्ध करून दिली आहे. झी युवा वाहिनीवरील, लाव रे तो व्हिडीओ हा नवा कोरा टॅलेंट शो, आगळेवेगळे कौशल्य जगासमोर आणणार आहे. प्रेक्षकांच्या खास टॅलेंटचा 2 ते 3 मिनिटांचा व्हिडीओ वाहिनीला पाठवायचा आहे. अर्थात हा व्हिडीओ आणि टॅलेंट खूप वेगळे असणे आवश्यक आहे.
हा नवाकोरा शो, मनोरंजनाच्या सर्व सीमा पार करणार आहे. कॉमेडी, डान्स, मिमिक्री अशा अनेक टॅलेंटचा या कार्यक्रमात समावेश असेल. कधी हास्याची लकेर तर कधी एंटरटेन्मेंटचा कल्ला पाहायला मिळेल. लाव रे तो व्हिडीओ म्हणत, झी युवा हा मजेदार कार्यक्रम सगळय़ांसाठी घेऊन येत आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळून संपूर्ण महाराष्ट्राचे मनोरंजन करण्यासाठी झी युवा वाहिनी सज्ज आहे. कार्यक्रमाचा सूत्रसंचालक कोण असणार हे गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.