प्रतिनिधी/ पणजी
झुवारी नदीवरील आगशी-कुठ्ठाळी पूल 18 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 ते 9 या वेळेत (तीन तास) वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार असून त्यावेळी पुलाची तपासणी, निरीक्षण होणार आहे. त्या वेळेत वाहनचालकांनी बोरी पुलाचा किंवा आगशी-कुठ्ठाळी फेरीबोटीचा वापर करावा अशी सूचना करण्यात आली आहे. वाहनचालकांसाठी वरील वेळेत फेरीबोटसेवा उपलब्ध करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने वरील सूचना दिली असून त्याची दखल वाहन चालकांनी घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.