वृत्तसंस्था /नवी दिल्ली :
व्हीडीओ परिषद, बैठका व चर्चा करण्यासाठी वापरण्यात येणारे झूम ऍप भारतात व्यवसायात वाढ करण्याची तयारी करत आहे. याचाच एक भाग म्हणून झूम येत्या काळात भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळख असणारे बेंगळूर येथे नवीन टेक्नॉलॉजी केंद्र उभारण्याचा विचार करत असल्याचे समजते.
भारतात होत असणाऱया ऑनलाईन बैठकासोबत अन्य विषयांसाठी व्हिडीओ ऍपचा वापर केला जात असून याची संख्या येत्या काळातही कोविडच्या भीतीमुळे वाढत जाण्याचे संकेत व्यक्त केले जात आहेत. यामुळे झूम येणाऱया काळात आवश्यक असणाऱया कर्मचाऱयांची रिक्त पदे भरण्यावर भर देणार असल्याची माहिती आहे.
ऍपमध्ये आवश्यक ते बदल करण्यावर भर दिला जाणार असून कंपनी वाढत जाणाऱया लोकप्रियतेच्या जोरावर आपले नवीन टेक्नॉलॉजी केंद्र उभारण्याचा विचार करत असल्याचे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पणा बावा यांनी स्पष्ट केले आहे. वर्ष 2020 च्या पहिल्या चार महिन्यात म्हणजे जानेवारी ते एप्रिल या कालावधीत भारतात झूमच्या मोफत वापरकर्त्यांच्या साइन अपमध्ये 6,700 टक्क्मयांनी वृद्धी झाली आहे.
मुंबई, हैदराबादमध्ये दोन डाटा केंद्रे
झूम व्हीडीओ कम्युनिकेशनने म्हटले आहे की, बेंगळूरमध्ये नवीन केंद्र उभारणार आहे. मुंबई आणि हैदराबाद येथे दोन डाटा केंदे आहेत. यामध्ये आणखीन वाढ करण्यात येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.