शाहुवाडी / प्रतिनिधी
परतीच्या पावसाने भातपिकासह अन्य पिकानां चांगलाच फटका बसला , मात्र झेंडू उत्पादकांना दसरा सणाला थोडाफार हातभार लागल्याने शेतकरी बांधवांच्यातून समाधान व्यकत होत आहे . शेवटच्या क्षणी लाभलेला दर हा झेंडू उत्पादकांचे मनोबल वाढविणारा ठरला आहे . दोनशे रुपये किलो गेल्याने उत्पादकांच्या समाधान मात्र ग्राहकांच्यात दराचीच चर्चा अधिक प्रमाणात दसरा सणाला झेंडू फुलांची अधिक मागणी असल्याने मलकापूर बांबवडे बाजारपेठेत बाहेरील झेंडू उत्पादकांनी फुलांचे स्टॉल लावले होते . परतीच्या पावसाने पिकांना चांगलाच फटका बसला होता . मात्र दसरा सणा दिवशी झेंडू फुलाला मिळालेला दर झेंडू उत्पादकांना चांगलाच हातभार लावुन गेल्याने झेंडू उत्पादकांच्यातुन चांगलेच समाधान व्यक्त होऊ लागले आहे.
दसरा दीपावली सणाचे औचित्य साधून योग्य नियोजन व मशागतीच्या माध्यमातून निर्माण केलेल्या झेंडा पिकाला चांगला दर येईल या आशेन असलेल्या झेंडू उत्पादकांना परतीच्या पावसाचा फटका बसला आहे. मात्र त्यातूनही काही प्रमाणात सावरलेल्या झेंडू बागेला दसरा सणादिवशी उच्चांकी दर मिळाल्याने एक दिवस का होईना मिळालेल्या या शेतकरी बांधवांना चांगलाच आधार ठरत होता.
मलकापूर सह बांबवडे बाजार पेठेत बाहेर उत्पादक शेतकरी आले होते , यामुळे बाजारात झेंडूची आवकही वाढली होती. ग्रामीण भागासह अन्य ठिकाणाहून बऱ्यापैकी दिसत होती दसरा सणादिवशी झेंडू उत्पादकांना मिळालेला दर या नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी चांगलाच आधार ठरत आहे. एकूणच दसरा सणा दिवशी झेंडू पुराला चांगला दर मिळाला दोनशे रुपये किलो दराने झेंडू गेल्याने उत्पादकांच्यात समाधान दिसत होते , मात्र ग्राहकांच्यात ग्रहकांच्या दराची चर्चा चांगलीच रंगली होती.