सुर्या गावकर मालिकावीर, सुनील चावरी सामनावीर
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
सुनील चावरीच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर झेन स्पोर्टस् संघाने जी. जी. बॉईज संघाचा अंतिम सामन्यात तीन गडय़ांनी पराभव करुन दुसरा श्री चषक अखिल भारतीय टेनिस बॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. सुर्या गावकरने मालिकावीरासह दुचाकी वाहनाचे बक्षीस पटकाविले. तर अंतिम सामन्यातील सामनावीर पुरस्कार सुनील चावरीला देण्यात आला.
व्हॅक्सीन डेपो मैदानावर खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात जी. जी. बॉईज संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 5 बाद 82 धावा केल्या. मनोज नार्वेकरने 4 षटकार व 2 चौकारासह 16 चेंडूत 40 तर सुर्या गावकरने 1 षटकार 1 चौकारासह 12 धावा केल्या. झेन स्पोर्ट्सतर्फे विश्वजीतने 24 धावा 2 तर इम्रोज खान व अशिष मेहुल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना झेन स्पोर्टस् संघाने 7 षटकात 7 बाद 83 धावा करुन सामना तीन गडय़ांनी जिंकला. सुनील चावरीने 3 षटकार व 3 चौकारासह केवळ 14 चेंडूत 35 धावा केल्या. सुहास पवार व विश्वजित यांनी 1 षटकार 1 चौकारासह प्रत्येकी नाबाद 12 धावा केल्या. जी. जी. स्पोर्टस्तर्फे सुर्या गावकरने 9 धावांत 2, साहील व्ही. ने 22 धावांत 2 तर गौरेश नार्वेकरने 19 धावांत 2 गडी बाद केले.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे विजय अचमनी, विरेश किडसण्णावर, मल्लिकार्जुन जगजंपी, राहुल मुचंडी, निखिल मुरकुटे, प्रणय शेट्टी, चंदर कुंदरनाड, सुनील बुलबुले, कपिल भोसले, कोमल पाटील, संदीप चौगुले, गजनन मिसाळ व अर्जुन रजपूत या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या झेन स्पोर्टस् संघाला 1 लाख 55 हजार 555 रुपये रोख, आकर्षक चषक देवून गौरविण्यात आले.
वैयक्तिक बक्षीसे
अंतिम सामन्यातील सामनावीर-सुनील चावरी (झेन स्पोर्टस), उत्कृष्ट फलंदाज-प्रथमेश पवार (झेन स्पोर्टस्), उत्कृष्ट गोलंदाज-गौरेश नावगेकर (जी. जी. स्पोर्टस्), इम्पॅक्ट खेळाडू-भूषण गोले सरकार यांना चषक व रोख रक्कम देवून गौरविण्यात आले तर मालिकावीर-सुर्या गावकर (जी. जी. स्पोर्टस) याला बजाज दुचाकी वाहन, रोख रक्कम व आकर्षक चषक देवून गौरविण्यात आले.
या स्पर्धेसाठी पंच म्हणून सुनील पाटील व सचिन सांगलेकर तर डान्सींग पंच गोटय़ा (मुंबई) यांनी काम पाहिले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विश्वजित चौगुले, नितीश कांबळे, विजय जाधव, संजय जाधव, सुनील कोनेरी, प्रसाद शिरवलकर, विनायक चव्हाण, अमय लेंगडे, विनय जाधव, कृष्णकांत गौंडवाडकर, सागर जाधव, अमर जाधव, भरत शिंदोळकर, अभिषेक चौगुले यांनी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धेचे समालोचन युवराज जाधव व आरीफ बाळेकुंदी यांनी केले.