रुक्मिणीनगरात जिल्हाधिकाऱयांकडून पाहणी : अधिकाऱयांना सूचना
प्रतिनिधी /बेळगाव
झोपडपट्टी विकास मंडळाच्या अधिकाऱयांनी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत रुक्मिणीनगर येथील झोपडपट्टीवासियांना घरे उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. यासाठी त्याची तातडीने यादी तयार करावी, असे आदेश जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी अधिकाऱयांना दिले आहेत. बुधवारी जिल्हाधिकाऱयांनी भेट देऊन नागरिकांची कैफियत ऐकून घेतली.
यावेळी महिलांनी आम्हाला राहण्यासाठी घरे नाहीत, पाणीपुरवठा योग्यप्रकारे होत नाही, स्वच्छता तर कधीच केली जात नाही. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही विविध समस्यांना तोंड देत आहे. याबाबत अनेकवेळा अधिकाऱयांना कळविले. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना सांगण्यात आले. जिल्हाधिकाऱयांनी तातडीने लोकांच्या समस्या दूर करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या पाहिजेत, कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नका, अशी सक्त ताकीद यावेळी दिली आहे.
रुक्मिणीनगर येथे 400 कुटुंबे झोपडपट्टीमध्ये राहात आहेत. त्या संपूर्ण कुटुंबांची माहिती घ्या आणि तातडीने यादी तयार करा. तसेच पंतप्रधान आवास योजनेंतर्गत या सर्वांना घरे मंजूर करा, असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी महानगरपालिका आयुक्त रुदेश घाळी, झोपडपट्टी विकास मंडळाचे साहाय्यक कार्यकारी अभियंते डॉ. शंभू लिंगप्पा यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.