डोळे उघडताच खात्यात येतात पैसे
जो झोपून राहतो, तो बरेच काही गमावतो या अर्थाची म्हण हिंदीत आहे. परंतु आता ही म्हण बदलली आहे. कारण आता तर झोपणारे लोक देखील लाखोंमध्ये कमाई करत आहेत. एका व्यक्तीला झोपेत पाहण्यासाठी लोकांनी लाखो रुपये खर्च पेले आहेत. एक युटय़ूबर झोपण्यापूर्वी खोलीत कॅमेरा ऑन करून झोपतो. तरीही त्याला पाहण्यासाठी मोठी चढाओढ दिसून येते.
झोपून मालामाल
झोपण्याच्या बदल्यात लाखो कमाविणारा आठवडय़ात एक दिवस स्वतःच्या झोपण्याचा व्हिडिओ युटय़ूबवर अपलोड करतो. केवळ एवढे काम करून त्याला चांगली कमाई प्राप्त होते. युटय़ूबवर सुपर मेनस्ट्रीम नावाने चॅनेल चालविणारा व्यक्ती एका रात्रीतील सुमारे 6 तासांच्या झोपेच्या व्हिडिओद्वारे 2 लाख रुपये कमावितो.
काय आहे विशेष
लाइव्ह व्हिडिओत अनेक लोक कमी कॉल किंवा मेसेजेस करून त्याची झोपमोड करण्याचा प्रयत्न करतात. संबंधित व्यक्ती स्वतःच्या झोपेसोबत संघर्ष करत रात्र घालवितो. झोपेसोबत या लपाछपीच्या खेळाचा आनंद घेण्यासाठी लोक लाखो रुपये खर्च करण्यास तयार असतात. 21 वर्षीय या युटय़ूबरच्या स्लीप स्ट्रीमला लोक अत्यंत पसंत करत आहेत. याच्या सोशल मीडियावर स्लीपिंग व्हिडिओज लाखोवेळा पाहण्यात आले आहेत.