नवी दिल्ली
झोमॅटो या खाद्य पुरवठा (फूड डिलिव्हरी) करणाऱया कंपनीने ग्राहकांसाठी नवीन सेवा बाजारात आणली आहे. कोविड संकटासह अन्य प्रभावामुळे व्यवसाय पूर्ववत करण्यासाठी कंपनी नवी योजना आखण्याची तयारी करीत आहे. यामध्ये कंपनीने ‘टेकअवे सर्व्हिस’ची सुरुवात केली आहे. या सेवेच्या आधारे ग्राहक झोमॅटो ऍपवरुन फूड ऑर्डर करु शकणार असून ते स्वतः आपली ऑर्डर प्रत्यक्ष जाऊन घेऊ शकणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. नवीन योजनेंतर्गत झोमॅटो डिलिव्हरी करणार नाही. तसेच रेस्टॉरंटचे कमीशन रक्कमही घेणार नाही. तसेच पेमेंट गेटवे शुल्कही वसूल करण्यात येणार नसल्याने रेस्टॉरंटला नफा कमाई करता येणार असून ऑर्डर्सही वाढणार असल्याचे झोमॅटोने स्पष्ट केले आहे. कोविड संकटानंतर आता खाद्यव्यवसाय नुकसानीनंतर गती घेत आहे.