नवी दिल्ली
खाद्यपदार्थांची डिलिव्हरी करणाऱया झोमॅटो प्रायव्हेट लिमिटेडच्या गुंतवणुकीत अलीकडेच 1455 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीमुळे कंपनीची आर्थिक बाजु अधिक भक्कम झाली आहे. लक्सर, कोरा आणि स्टेडव्ह्युव्ह यासह एकूण सहा कंपन्यांनी झोमॅटोमध्ये वरीलप्रमाणे रक्कमेची गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीच्या माध्यमातून झोमॅटोने 1455 कोटी रुपये उभारले आहेत.