770 कोटी समभागांसाठी प्रस्ताव दाखल – गुंतवणूकीला प्राधान्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
झोमॅटो कंपनीकडून बुधवारी आयपीओ खुला करण्यात आला असून शुक्रवारी बंद झाला आहे. पहिल्या व दुसऱया दिवशी मिळालेला प्रतिसाद वाढत जात शुक्रवारीही कायम राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. शेअर बाजाराकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार सादरीकरणासह 71.92 कोटी समभागाच्या तुलनेत 770.7 कोटी समभागांसाठी प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत.
किरकोळ गुंतवणूकदारांनी आपल्या आरक्षित हिस्सेदारीच्या तुलनेत 6.09 पटीने अधिक प्रस्ताव दाखल केले आहेत. किरकोळ व्यक्तिगत गुंतवणुकीसाठी आरक्षित 12.95 कोटी समभागाच्या तुलनेत दुपारी 1 वाजेपर्यंत 78.87 कोटीच्या समभागांसाठी प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपल्या आरक्षित हिस्सेदारीतील 19.42 कोटी समभागांच्या तुलनेत 109.82 कोटींचे प्रस्ताव दाखल केले आहेत.
कर्मचाऱयांच्या हिस्सेदारीतील प्रस्ताव
झोमॅटो कंपनीने आपल्या कर्मचाऱयांसाठी वेगळा हिस्सा राखीव ठेवला असून यामध्ये जवळपास 42 टक्क्यांपेक्षा अधिकचे प्रस्ताव दाखल झाले असल्याची माहिती आहे.