जर तुमच्या डोक्यावरील केस भरपूर प्रयत्न करूनही उडाले असतील तर निराश होण्याचे कारण नाही. अमेरिकेच्या वैज्ञानिकांनी टक्कल पडण्यासाठी जबाबदार असणार्या प्रोटीनचा शोध लावला आहे.
- या शोधानंतर केस गळण्याच्या प्रक्रियेस पूर्णतः रोखणारी क्रीम बनवणे शक्य असल्याचा दावाही शास्त्रज्ञांनी केला आहे.
- पेन्सिलवेनिया युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांप्रमाणे टक्कल पडलेल्या ठिकाणी प्रोस्टाग्लँडिन प्रोटीन दिले गेल्यास केस उगवण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू होऊ शकते.
- प्रोस्टाग्लँडिन डी सिन्थेज नावाचे विशिष्ट प्रोटीन ज्या जागी एकत्रित होते तिथे टक्कल पडण्यास सुरूवात होते. शास्त्रज्ञांना पूर्ण विश्वास आहे की, टक्कल पडणे थांबवणे आणि टक्कल पडलेल्या ठिकाणी पुन्हा केस उगवणे शक्य झाले आहे.
- सध्या आपल्याकडे टक्कल पडण्याच्या समस्येवर हेअर ट्रान्स्प्लांट करण्याचा पर्याय वापरला जातो. पण त्यातील गुंतागुंत आणि यशापयश यांचा विचार करता हे नवे संशोधन अधिक दिलासादायक ठरणारे आहे.