ऑनलाईन टीम / डोडोमा :
न्यूझीलंडनंतर टांझानिया हा देश आता कोरोनामुक्त झाला आहे. टांझानियाचे अध्यक्ष जॉन मगुफुली यांनी देश कोरोना मुक्त झाल्याची घोषणा केली आहे.
मगुफुली यांनी डोडोमा येथे एका चर्चमध्ये देश कोरोनामुक्त झाल्याची घोषणा केली. यावेळी बोलताना ते म्हणाले. टांझानिया आता कोरोना संकटातून बाहेर आला आहे, त्यामुळे धोका कमी झाला आहे. तरी देखील खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे. देशाच्या कोरोनामुक्तीचे संपूर्ण श्रेय त्यांनी देवाला दिले आहे.
मगुफुली यांनी टांझानियामधील चर्च, मस्जिद, हॉटेल, रेस्टॉरंट, पब यावरील बंदी उठवली आहे. विद्यापीठे, महाविद्यालले आणि आंतरराष्ट्रीय प्रवास पुन्हा सुरू करण्यात आला आहे.