वृत्तसंस्था/ कोलकाता
टाटा मोटर्सने जागतिक स्तरावर मार्च तिमाहीमध्ये 3 लाख 34 हजार 884 गाडय़ांची विक्री करण्यामध्ये यश मिळवले आहे. यायोगे टाटा मोटर्स ग्रुपने मार्च अखेर संपलेल्या तिमाहीत आर्थिक वर्ष 2022 मध्ये जागतिक स्तरावर वाहन विक्रीमध्ये 2 टक्के इतकी वाढ दर्शविली आहे. ही वाढ वर्षाच्या आधारे टाटाने नोंद केली आहे.
यामध्ये जग्वार लँड रोवर कारचाही समावेश असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. दुसरीकडे टाटाची देवू ही 1 लाख 22 हजार 147 इतक्मया संख्येने विकली गेली आहे. मागच्या तिमाहीच्या तुलनेमध्ये या गाडीच्या विक्रीमध्ये 12 टक्के इतकी लक्षणीय वाढ दिसली आहे. जग्वार लँड रोवर गाडीची विक्री सदरच्या तिमाहीत 89 हजार इतकी झाली असल्याचे समजते.