मुंबई
टाटा मोटर्स जेएलआरची विक्री करणार असल्याच्या शक्यतेला अखेर कंपनीने पूर्णविराम दिला आहे. टाटा मोटर्सने जेएलआर अर्थात जगुआर लँड रोवरची विक्री करणार नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. यासंदर्भात काही दिवसांपासून चर्चा चालली होती. नेमके काय होणार याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले होते. टाटाने विक्री होणार नसल्याचे स्पष्ट करत जेएलआर कायमस्वरूपी टाटाअंतर्गत राहणार असल्याचे सांगत अनाहुत चर्चांना पूर्णविराम दिला आहे. काही मीडिया संस्थांनी याबाबत उलटसुलट बातम्या पसरवल्या होत्या. जेएलआरचा व्यवसाय उत्तमपणे सुरू असल्याचे टाटाने स्पष्ट केले आहे. काही दिवसांपूर्वी बीएमडब्ल्यू कंपनी जगुआर लँड रोवर खरेदी करणार असल्याचे बोलले जात होते. चीनमध्ये लँड रोवरची विक्री घसरली होती पण आता पुन्हा विक्रीने जोर पकडला असल्याचे समजते.