नवी दिल्ली
देशातील दिग्गज कंपनी टाटा मोटर्सने आपली किरकोळ विक्री वेगाने वाढविण्यासाठी नवीन रणनिती आखण्यास सुरुवात केल्याचे स्पष्ट होत आहे. यासाठीच कंपनीने दक्षिण भारतामध्ये एकाचवेळी जवळपास 70 नवीन विक्री आउटलेटस्चे उद्घाटन केले आहे.
टाटाने दिलेल्या माहितीनुसार नवीन आउटलेटस् 53 शहरांमध्ये सुरु करण्यात येणार असून याच्यासाठी दक्षिण भारतात प्रमुख बाजारापेठांवर लक्ष्य केंद्रीत करण्यात येणार असल्याची माहिती आहे. या नव्या शोरुम्समध्ये कंपनी इलेक्ट्रिक वाहनांसह प्रवासी वाहनांची ‘न्यू फॉरएव्हर’रेंज ठेवण्यात येणार आहे.
नव्या शोरुम्सचा विस्तार
नवीन शोरुम्ससोबत टाटा मोर्ट्स दक्षिण भारतात कर्नाटक, तामिळनाडू, पुदुचेरी, तेलंगना, आंध्रप्रदेश आणि केरळमधील नेटवर्कचा विस्तार करत 272 सह देशात यांची संख्या वाढून 980 च्या घरात पोहोचणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.