वृत्तसंस्था/ मुंबई
पीक संरक्षणासंबंधीचे रसायन बनविणाऱया हेरांबा इंडस्ट्रीजचा समभाग राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) जवळपास 900 रुपयावर लिस्ट झाला आहे. गुंतवणूकदारांना लिस्टिंगमधून 43.54 टक्क्यांचा परतावा मिळणार असल्याची माहिती आहे. शुक्रवारी सकाळी 10.23 वाजता बीएसईमध्ये समभाग 876.60 रुपयावर ट्रेडिंग करत राहिला होता. इंट्राडेमध्ये ही वाढ 944.95 पर्यंत वधारली होती.
हेरांबा इंडस्ट्रीजने आयपीओमधून 625 कोटी रुपये उभारले होते. कंपनीने इश्यूमध्ये 60 कोटी रुपयांचे प्रेश समभाग सादर केले होते जे 565.2 कोटी रुपयाच्या समभाग ऑफर फॉर सेलच्या आधारे करण्यात आले होते. हा इश्यू कालावधी हा 23 फेबुवारी ते 25 फेब्रुवारीपर्यंत खुला राहिला होता.
सदर इश्यूसाठी प्राईस ब्रँड 626-627 रुपये प्रति समभाग राहिला होता. जो 83 पटीने सबस्क्राईब झाला आहे. आयपीओच्या आधारे 58.15 कोटी इक्विटी समभागासाठी बोली प्राप्त झाली होती. हेरांबा इंडस्ट्रीजकडून कीटकनाशक प्रकारात कीड नियंत्रणासाठी विविध उत्पादनांची निर्मिती करण्यावर भर दिली जाते.