वृत्तसंस्था /नवी दिल्ली
टाटा मोर्ट्सने आपल्या प्रीमियम हॅचबॅक अल्ट्रोज श्रेणीत आता वाढ करत नवीन मॉडेल एक्सइ प्लस ट्रिम सादर केली आहे. यासोबतच कंपनीने एक्सएम ट्रिमला बाजूला केले आहे. एक्सइ प्लस मॉडेलला कंपनीने सादरीकरणात अव्वल स्थानी ठेवले आहे. सदरच्या मॉडेलची एक्स शोरुम किमत 6.35 लाख रुपये आणि डिझेल मॉडेलची एक्स शोरुम किमत 7.55 लाख रुपये आहे. या मॉडेलच्या इंजिनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, परंतु अंतर्गत काही बदल केले असल्याचे पहावयास मिळते.
अन्य फिचर्स
- 3.5 इंच इंफोटेनमेंट सिस्टम व 4 स्पीकर्स
- ब्लूटय़ूथ कनेक्टिविटी, युएसबी पोर्ट
- रिमोट कीलेस एंट्री
- एफएम व एएम रेडियो सुविधा
- टाटा अल्ट्रोज 1 लाख युनिटचे उत्पादन झाले आहे